Diva news : स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी दिव्यात स्वाक्षरी मोहीम

Maharashtra WebNews
0

 




 उबाठाच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणार्‍या गुन्हेगारीमुळे पोलीसांवर येणारा ताण हा देखील वाढत आहे. त्यासाठी दिव्यात स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही बाब उबाठाच्या दिवा शहर संघटीका ज्योती पाटील यांनी जाणून एक सही आपल्या सुरक्षित भविष्यासाठी, एक सही दिव्यासाठी, एक सही स्वतंत्र दिवा पोलीस ठाण्यासाठी असा सहीचा उपक्रम शनिवारी दिवा पुर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेर राबविण्यात आला.१५ हजार नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या सुरक्षेच्यासाठी स्वाक्षर्‍या केल्या.





दिवा शहराची लोकसंख्या पाच ते आठ लाखांच्यापुढे गेली असून कायदा व सुव्यवस्था आबाधित नियमित राखण्यासाठी व सध्या पोलिसांवर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे होण्यासाठी भव्य सह्यांची मोहीम काल आयोजित करण्यात आली होती. वाढती गुन्हेगारी, वाढत्या चोर्‍या या सर्वांचा ताण दिव्यातील पोलीस चौकीवर येत आहे. ही पोलीस चौकी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून दिव्यात दिलेली पोलीस तक्रारीची पोच पावती घेण्यासाठी नागरिकांना मुंब्र्याला जावे लागते. त्यामुळे पैसे व मेहनत वाचावी, वेळ वाचावा यासाठी ही उबाठातर्फे स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. 




स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी दिवा रेल्वे स्टेशन जवळ येऊन जास्तीत जास्त सह्या नागरिकांना कराव्यात, असे उबाठाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दिवेकरांना आवाहन केले होते. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी उबाठातर्फे घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला दिवावासियां बरोबरच माजी आमदार सुभाष भोईर, वैशाली दरेकर, सचिन पाटील, रोहिदास मुंडे, ज्योती पाटील, स्मिता जाधव, प्रियांका सावंत, योगिता नाईक, उमेश राठोड, राजेश भोईर, अभिषेक ठाकूर, प्रतिक म्हात्रे, अनिल पवार, संभाजी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वाक्षरीच्या प्रति ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात येणार आहे.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)