Diva news : दिवा स्थानकातून प्रवाशांच्या काळ्या फिती बांधून प्रवास

 



दिवा, (आरती मुळीक परब) : मध्य रेल्वे वरील गर्दीचे, महत्वाचे स्थानक म्हणून दिवा स्थानक ओळखले जाते. गेल्या २०१५ मध्ये झालेल्या रेल्वे आंदोलनानंतर प्रवाशांनी दिवा- सीएसएमटी ही लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडेकेली होती. या मागणीकडे प्रशानाने संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. तर या स्थानकातील सुविधांकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे. 


दिव्यातील प्रवाशांची वाढती संख्याबघून ट्रेनमध्ये चढताना उतरताना प्रवाशांचा जीव मेटाकूटीला येतो. त्यामुळे दिवा सीएसएमटी ही लोकल सेवा सुरू करावी अणि कोकणात जाणाऱ्या स्पेशल गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा, या मागणीसाठी दिव्यातील रेल्वे प्रवाशांनी आज हाताला काळ्या फिती बांधून प्रवास केला.


रेल्वे मार्गावरील ठाणे व डोंबिवली यानंतर दिवा स्थानकाकडे प्रमुख गर्दीचे स्थानक म्हणून बघितले जाते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी अथवा यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पोलीस संख्या ही कमी आहे. तर डोंबिवली वरून येणाऱ्या सकाळच्या सगळ्याच गाड्यांमध्ये दिवेकरांना चढताच येत नाही. गर्दीच्या वेळेत दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणे हे मोठे जिकरीचे झाले आहे.





दिव्यातील प्रवासी हा कसाबसा लोकलमधील दरावाजावर चढतो. त्यावेळी त्यांना पाय ठेवायला ही जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही वेळा प्रवाशांना लोकलला लटकून प्रवास करावा लागतो. यामुळे हात निसटून बऱ्याच प्रवाशांचा जीवसुद्धा गेला जाऊन, काही प्रवासी गंभीर जखमीही झाले आहे. त्यासाठी गेल्या ८ ते ९ वर्षांपासून दिवा रेल्वेप्रवासी आणि दिवेकर रेल्वे प्रवासी सातत्याने दिवा- सीएसएमटी ही लोकल सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा स्थानकातून सोडावी ही मागणी करत आहेत. परंतु, रेल्वे प्रशासन दिवेकर रेल्वे प्रवाशांची मागणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीयनि लक्ष द्यावे हाच आमचा हेतू आहे. 


भविष्यात दिवा- सीएसएमटी लोकल या मागणीसाठी दिवा स्थानकात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोकणात जाणाऱ्या बहुतांशी गाड्या या मुंबई, ठाणे, दिवा, पनवेल मार्ग कोकणात जातात. परंतु गणेशोत्सव, शिमगा व मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सोडण्यात येणाऱ्या स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिला जात नाही. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने याबाबत अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु रेल्वे प्रशासन सदर गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यासाठी असमर्थ ठरत असल्याचे मत ॲड.आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना यांनी व्यक्त केले. 




Post a Comment

Previous Post Next Post