Bihar news : आरक्षणाबाबत बिहारमध्ये आरजेडीचे आंदोलन

 



पटना : पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पुन्हा लागू करण्याची आणि त्याचा संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करत रविवारी बिहारमधील ३२ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.  राजदच्या वरिष्ठ नेत्यांसह विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी 
पाटण्यात आंदोलन केले. त्यांच्यासोबत आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, आरजेडी नेते उदय नारायण चौधरी, जयप्रकाश नारायण, अब्दुल बारी सिद्दीकी, प्रवक्ते चित्तरंजन गगन, शक्ती यादव, मृत्युंजय तिवारी हे धरणावर बसले आहेत. सध्या संपूर्ण देशात लोक आरक्षण आणि जात जनगणनेची मागणी करत आहेत.


 तेजस्वी यादव पाटणा यांनी उच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पुन्हा लागू करण्याची आणि त्याचा संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करत आम्ही १७ महिने सत्तेत होतो, तेव्हाच आरक्षणाची मर्यादा वाढवली? त्यांच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) कार्यकाळात असे का झाले नाही? असा प्रश्न विचारत सरकार केवळ नाटक करत त्यांनी म्हटले, त्याचबरोबर 
 आरक्षणाबाबत जे आज विधान करत आहेत तेच माझ्यासोबत बसून आरक्षणाची घोषणा करत असल्याची आठवण तेजस्वी यांनी करून दिली. तेजस्वी पुढे म्हणाले की, त्या काळात (महाआघाडीचे सरकार) पाच लाख नोकऱ्या देण्यात आल्या. क्रीडा धोरण आणि शैक्षणिक धोरण त्या काळात तयार करण्यात आले आहे.



तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जेडीयूवर टीका करत ते लोक नकारात्मक असल्याचा उल्लेख केला. तसेच जर तुम्ही काही सकारात्मक बोललात तर ते दुखावले जातील. मात्र, ते सत्तेत असतील तर त्यांची बिहारला विशेष राज्याचा देण्याची जबाबदारी आहे. मात्र बिहारचा विशेष दर्जा सोडा. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला नाही तेव्हा जेडीयूचे लोक टाळ्या वाजवत होते अशी टीका करत जेडीयू नेत्यांना त्यांनी आरक्षणाला नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या बाजूने आहेत की नाही ते स्पष्ट करण्याचे आवाहन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post