डोंबिवली ( शंकर जाधव ) : विविध मागण्याकरिता शुक्रवारी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे प्रदेश व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ यांचे विद्यमाने ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण-डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिक उघडे व डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य लाँग मार्च काढण्यात आला.
डोंबिवली पूर्वकडील बाजीप्रभू चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्च्याला सुरुवात करण्यात आली.रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे प्रदेश व कल्याण - डोंबिवली झोपडपट्टी महासंघ यांचे विद्यमाने ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण-डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिक उघडे, कामगार नेते महादूसिंग राजपूत, रिक्षा युनियन डोंबिवली अध्यक्ष संजय पवार, समाजसेवक शिवा पवार, जिल्हासंघटक वसंत टेकडे, डोंबिवली शहर युवक अध्यक्ष विकास खैरनार, जिल्हासंपर्क प्रमुख तुकाराम पवार,महिला आघाडी प्रमुख वैशाली सावर्डेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माणिक उघडे म्हणाले, कल्याण- डोंबिवली शहरातील झोपडपट्टीमध्ये शासनाची क्लस्टर योजनेचा तात्काळ शुभारंभ करा यासह अनेक महत्वाच्या मागण्या आहेत.आंबेडकरी जनतेच्या प्रमुख मागण्यांसाठी हजारो झोपडपट्टी धारक आंबेडकरी जनता मोर्चात सहभागी झाले होते.