अलिबाग, (धनंजय कवठेकर) : महा श्रमदान मोहीम अंतर्गत थळ ता. अलिबाग जि. रायगड येथील श्री दत्त मंदिर परिसरात सामूहिक श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलन मोहीम उत्साहात संपन्न झाली.
उपस्थितांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन प्लास्टिक व इतर कचरा एकत्रित करण्यात आला. माणुसकी प्रतिष्ठान थळचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ञ सुरेश पाटील, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड चे अध्यक्ष डॉ. रेखा म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग अध्यक्ष एडवोकेट के डी पाटील, जनशिक्षन संस्थान अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे तालुका शहर अध्यक्ष प्रकाश बुरूंगळे, सतीश बंडगर, माणुसकी सदस्य डॉ.राकेश सिंग,सुधाकर निषाद, एकनाथ राठोड, पंचायत समिती गट समन्वयक संदीप म्हात्रे, तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जीविता पाटील लायन्स मांडवा माजी अध्यक्ष मोहन पाटील, निसर्ग सुंदर थळ संस्था प्रतिनिधी तसेच थळ ग्रामपंचायतचे कर्मचारी,आदींनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला. संकलित प्लास्टिक कचरा थळ ग्रामपंचायतचे घंटा गाडीतून पुढे पाठविण्यात आले.