Dombivali news : डोंबिवलीत नेते सुनील केदारे यांच्या विरोधात आंदोलन

Maharashtra WebNews
0

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) : काँग्रेस नेते सुनील केदारे यांनी महाविकास महाविकास आघाडी सरकार आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू असे विधान केले होते. या विधानाचा शिवसेनेकडून राज्यभर निषेध होत आहे. गुरुवारी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने काँग्रेसचे सुनील केदारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. 




शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व जिल्हा संघटक लता पाटील यांच्या आदेशानुसार उपजिल्हा संघटक इंदिरा भोईर, जिल्हा संघटक शितल लोके,कविता गावंड, केतकी पोवार,स्वाती हिरवे, रोशना पाटील, उज्वला भोसले, लक्ष्मी पवार, अस्मिता खानविलकर, अवनी शर्मा यासह  महिला आघाडीने आंदोलन केले. आंदोलनात महिलांनी आक्रोश व्यक्त करत केदारे यांना 'सावत्र भावाची' उपमा दिली. 'साडी चोळी बांगड्या सुनील केदारेच्या तोडू तंगड्या'अशा घोषणा देत शिवसैनिक महिलांनी केदारे यांच्या विधानावर  संताप व्यक्त केला.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)