दिवा (आरती मुळीक परब): घरातील कौटूंबिक वादातून स्वतःच्या पत्नीची चाकूने हत्या करुन मुळगावी रत्नागिरीला फरार झालेल्या प्रितेश शिर्के (३७) याला पकडण्यात दिवा पोलिसांना यश आले असून त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहीतीनुसार, दिव्यातील तानाजी म्हात्रे चाळ, विकास म्हात्रे गेट येथील मयत द्रोपती प्रतिश शिर्के (४७) आणि प्रितेश शिर्के असे पती- पत्नी वास्तव्यास होते. त्यांचे १० महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते. १५ सप्टेंबरला घरात भांडण होऊन आरोपी प्रितेश शिर्के याने स्वतःच्या बायकोची द्रोपतीची घरच्या चाकूने खून करून कोकणातील रत्नागिरी गावी पळून गेला होता. याची माहिती मयत द्रोपदीच्या डोंबिवली येथे राहणाऱ्या बहीणीला रेश्मा पाटील हिला द्रोपदीचा खून झाल्याचे पोलिसांनी दिली. दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी प्रितेश शिर्के विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपी प्रितेश शिर्के हा खून करुन फरार असल्याने दिवा पोलीसांसमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान होते. पोलीस उपआयुक्त सुभाष बुरसे, सहा.पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे, पोलीस निरिक्षक राजू पाचोरकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार केली. त्यानंतर फरार आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी प्रितेश शिर्के हा आपल्या मुळ गावी मु. देव्हारे, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे लपून बसल्याचे समजले. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी आणि अंमलदार रत्नागिरी येथे रवाने झाले. त्याला तेथून शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी केलेल्या तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डंबरे, पोलीस सह. आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप. आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दिवा चौकीतील सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र तोरमडल, सहाय्यक पोलीस निरिक्षक खंडू तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वसंत खतेले, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल कोळेकर, पोलीस हवालदार उमेश मोरे, पोलीस ना. योगेश्वर पाटील, पोलीस ना. जयेश तामोरे, पोलीस ना. किशोर वैरागकर, पोलीस ना. समाधान माळी, पोलीस शिपाई वसिम तडवी, पोलीस शिपाई नारायण गंगावणे, पोलीस शिपाई महेश जाधव, पोलीस शिपाई प्रमोद शिंदे, पोलीस शिपाई समाधान जाधव यांनी केली.