डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त सिस्टर निवेदिता शाळेतील तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांनी देसाई यांच आभार मानले.
मंगळवारी २४ तारखेला सिस्टर निवेदिता विद्यालयात डोंबिवली शिक्षण पप्रसारक मंडळाचे अध्यक्ष देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व शिक्षक वर्गाने शुभेच्छा दिल्या. एका विद्यार्थीने देसाई यांना गायनाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर शिक्षकांनी सुंदर नृत्याच्या माध्यमातून देसाई यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केल्याचे जाहीर करताच उपस्थिती इतर पालकांनी देसाई यांचे कौतुक केले. देसाई यांनी आपल्या भाषणात शिक्षणावर आपले मत व्यक्त शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन शिकवणे आवश्यक असल्याचे सांगितले.