सोगाव (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गणेशभक्तांना २०२४ सालच्या गणेशोत्सवानिमित्ताने ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे मोफत पूजा साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे यापूर्वीही मापगाव ग्रामपंचायत विभागात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आदी क्षेत्रातील उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले आहेत. यापुढेही असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा मानस ग्रामविकास
परिवर्तन आघाडीचे तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पूजा साहित्यामध्ये अगरबत्ती, धूप, तेल, आदी साहित्यासह आरती संग्रह पुस्तकाचे समावेश असून गणेशोत्सवादरम्यान पूजा करताना गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी छोटासा दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे सांगण्यात आले आहे.
