७०.५९ मीटर भाला फेकून विक्रम केला
पॅरिस : पॅरालिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेक पॅरा ॲथलीट सुमित अँटीलने चमकदार कामगिरी केली आणि पुरुषांच्या भालाफेक F६४ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सुमितने दुसऱ्या प्रयत्नात ७०.५९ मीटर भाला फेकला जो त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. एवढेच नाही तर सुमितचा हा थ्रोने पॅरालिम्पिक स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला आहे. सुमितने पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आणि आपल्या विजेतेपद कायम राखले आहे.
सुमितने ६९.११ मीटरच्या थ्रोने सुरुवात केली, पण पुढच्याच प्रयत्नात त्याचा सर्वोत्तम थ्रो केला. यानंतर, त्याने तिसऱ्या प्रयत्नात ६६.६६ मीटर फेकले, तर चौथ्या प्रयत्नात फाऊल झाला. त्यानंतर त्याने ६९.०४ मीटर आणि सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ६६.५७ मीटर फेक केली. आणखी एक भारतीय ॲथलीट संदीपने F४४ प्रकारात ६२.८० मीटरची सर्वोत्तम थ्रो केलि आणि चौथे स्थान पटकावले, तर संदीप संजयने याच प्रकारात ५८.०३ मीटरची सर्वोत्तम थ्रो केला आणि सातव्या स्थानावर राहिला.
सुमितने दुसऱ्या प्रयत्नात ७०.५९ मीटरचा भाला फेकला जो त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. एवढेच नाही तर सुमितचा हा थ्रो पॅरालिम्पिक स्पर्धेतील विक्रम ठरला आहे. मात्र, सुमितला ७५ मीटर भालाफेक करता आला नाही. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी त्याने ७५ मीटरचे लक्ष्य ठेवले होते. सुमित अंतिल हा पॅरालिम्पिक विजेतेपद राखणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. ही कामगिरी करणारा सुमित हा देशातील दुसरा खेळाडू बनला आहे. हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेल्या सुमितचा विश्वविक्रम ७३ मीटर आहे. २०२३ आणि २०२४ वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप व्यतिरिक्त, सुमितने हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्येही सुवर्णपदक पटकाविले आहेत.
याच स्पर्धेत श्रीलंकेच्या दुलन केने रौप्यपदक पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनला कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत भारताचा संदीपही सहभागी झाला होता. त्याने ६२.८० मीटरचा भालाफेक केला आणि तो चौथा राहिला. संदीप संजय सागरने ५८.०३ मीटरसह सातवे स्थान पटकावले.
.jpeg)