Kolhapur news : साडेपाच लाखाचा गांजा विक्री करणारे अटकेत

Maharashtra WebNews
0



कोल्हापूर, (शेखर धोंगडे) : राजारामपुरी हद्दीत राजाराम तलाव परिसरामध्ये काही इसम गांजा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याने दिली होती. त्यानुसार परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली असता त्यांना दोन इसम तीन बॅगेसह संशयीतरित्या फिरताना व थांबलेले निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच सुमारे पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा २८ किलो वजनाचा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. 

या करवाईमध्ये निहाल इकबाल शेख (वय २७रा. शिरपूर जिल्हा धुळे) चरण लालासो शिंदे (वय ३२ रा. मान.सातारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये 'निहाल इकबाल शेख'  व चरण शिंदे याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये आधीच गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. या दोघांच्या वर राजारामपुरी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी, पोलीस निरीक्षक चेतन मस्तगे व पोलीस पथक मधील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील संतोष बर्गे योगेश गोसावी महेंद्र कोरवी विशाल खराडे परशुराम गुजरे अशोक पवार अनिल जाधव सुशील पाटील यांनी भाग घेतला या पथकाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मार्गदर्शन केले.


 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)