डोंबिवली ( शंकर जाधव ) : नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी शिवसेना नेहमीच पुढे असते. डोंबिवलीजवळील टाटा पॉवर गेटसमोरील रस्त्यावर एका बसचा अपघात झाला होता. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे नवरात्रौत्सवानिमित्त विविध मंडळाना भेटी देऊन येत असताना त्यांनी रस्त्यावर बसचा अपघात पाहिला.
सुदैवाने बसमध्ये फक्त चालक असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ही वाहतूककोंडी बाजूला शहरप्रमुख मोरे यांनी करण्यासाठी ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधला. मोरे यांनी बसचालकाला कुठे लागले तर नाही ना याची चौकशीही केली. मोरे हे स्वतः नागरिकांची मदत करत असल्याचे पाहून त्यांनी आभार मानले.