दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठानकडून नागरिकांना कंदील वाटप

 



दिवा,  (आरती परब) : दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना विविध मदत करत असतात. त्यांच्या कडून दरवर्षी दिवाळीला सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वर्षीही 
श्रीमंतयोगी प्रतिष्ठान कडून दातीवली तलाव येथे दिवाळी निमित्ताने गरीब व गरजू नागरिकांना मोफत कंदील वाटप करण्यात आले. 

दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान गेली नऊ वर्षे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तर माणगांव तालुक्यातील खेडेगावातील १२  जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच मुरबाड मधील आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ आणि कपडे वाटप, आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी नागरिकांना तेथेच आरोग्य शिबिद्वारे आरोग्य तापासणी केली जाते, अनेक जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, आषाढी वारी निमित्त पंढरपूरला चहा, बिस्किटे देऊन वारकऱ्यांची सेवा केली जाते असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असते. दिव्यातही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम ही संस्था नेहमी घेते.


 

आपण ही समाजाचे एक भाग आहोत, ही जाणीव ठेऊन या संस्थेतील प्रत्येक जण समाजसेवेसाठी पुढाकार घेत असतो. या श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष अरविंद उभारे, अजय चव्हाण, उपाध्यक्ष राहुल कानसकर, संकेश भावे, तुकाराम उंढरे, सुधाकर हर्नेकर, अनिल करकरे, दिनेश सावंत, कृष्णा चौगुले, संदीप वारंग, दत्ताराम कोशिमकर, ऋषीं सुर्वे, अरविंद घोगळे, सचिन घाणेकर, संभाजी कणसे, सुनील शिर्के, रवी शेजवळ हे सर्व सामाजिक उपक्रमात अतोनात मेहनत घेत असतात. या कंदील वाटप प्रसंगी दिव्यातील माजी. नगरसेवक दिपक जाधव, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे व शाखाप्रमुख निलेश म्हात्रे उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post