अंबरनाथमध्ये ९ बांगलादेशींना अटक


अंबरनाथ/अशोक नाईक : ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैधपण वास्तव्यास असलेल्या परकीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई सत्र सुरू असताना गोपनीय सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत निवास करून राहत असलेल्या सर्वोदयनगर येथील सृष्टीहिल सोसायटीमधून ९ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसह अटक केली आहे.जे भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गोपनीय पथकाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. 


        २९ एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार   अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदयनगर परिसरातील सृष्टीहिल सोसायटी मधील बिल्डिंग १आणि ४ मध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत आहेत. या माहितीची पुष्टी करण्यासाठी, पोलिस पथकाने दोन पंच आणि एका दुभाष्याच्या उपस्थितीत छापा टाकला असता, फ्लॅट क्रमांक ३०२  मध्ये ५ पुरुष, ४ महिला आणि ५ मुले आढळून आली. चौकशी दरम्यान, ते सर्वजण भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही वैध कागदपत्रे किंवा पुरावा सादर करू शकले नाहीत. मोबाईलच्या तपासणी दरम्यान, काही लोकांकडे बांगलादेशी ओळखपत्रे असल्याचे आढळून आले, ज्यामध्ये त्यांचा मूळ पत्ता - पेडवली गाव, कालिया पोलिस स्टेशन, जिल्हा नोडिले, बांगलादेश असा उल्लेख होता. चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केले की, ते गेल्या ४ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत.


या कारवाईमध्ये अटक केलेल्यांची नावे अशी आहेत : पुरुष: अलामिन युसूफ शेख (४०), आरिफुल अफसर शेख (३१), अलिनूर दाऊद बिस्वास (४४), रब्बी अलामिन शेख (१८), मनीर जब्दुल सरदार (३५) तर महिला: शबोना रसेल खान (२६), नर्गिस अलामिन शेख (४०), अफिया मिनार सदल (२६), हाफिजा शरीफुल मुल्ला (२६)या सर्वांविरुद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा १९२० च्या कलम ३, ४ आणि परदेशी कायदा १९४६ च्या कलम १३, १४ (अ), १४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.


        सदर उल्लेखनीय कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, उल्हासनगर परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे (गुन्हे), प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कजारी, पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंढे, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र चव्हाण, पोहवा सचिन जाधव, पोना ठाकूर, पोहवा अनुरोध गावित, पोशि. स्वप्निल पाटील, राजकुमार राठोड, गणेश गुत्ते, हरेश्वर चव्हाण,वासुदेव दराडे,  जोशी, सूर्यवंशी,परदेशी, गवळी, मुंडे,मपोहवा चौधरी, खंडागळे, मपोशि जाधव यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post