डोंबिवली ( शंकर जाधव ) : नवरात्र म्हटले की सर्वत्र एक चैतन्यमयी आणि उत्साह असे वातावरण आणि भोंडला. भोंडला हा उत्सव खास स्त्रियांसाठी साजरा केला जातो.आता हा सण घरघुती नसून सामाजिक स्वरूपात साजरा करतात. डोंबिवलीतील पाथर्ली येथील मनसे डोंबिवली शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका मंदा पाटील यांच्या वतीने प्रभागातील महिलासाठी भोंडला या कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी हत्तीच्या मूर्तीची पूजा करून भोंडल्याची सुरुवात करण्यात आली.
ऐलमा पैलमा गणेश देवा’चा.,एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू, दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू’पासून ‘कारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुने, मग जा आपुल्या माहेरा... माहेरा...’, ‘सर्प म्हणे मी एकुला, दारी आंबा पिकूला, दारी आंब्याची कोय गं, खिरापतीला काय गं’पर्यंत ची गमतीदार गाणी अभंग भजनी मंडळ यांनी सादर केली. या गाण्यांवर महिलांनी व मुलींनी फेर धरून भोंडल्याचा आनंद घेतला.मनसे डोंबिवली शहरअध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका, कोमल पाटील, सुमेधा थते,अंजना भोईर, कीर्ती मगरे, मेघा म धुसूदन चोरगे, दीपिका वालेकर,आर्या भावसार,अंजना भोईर,अर्चना गायकवाड,श्रद्धा किरवे,ममता आपटे,शलाका कानडे, समीक्षा इब्राहिमपूरकर, ज्योती पेडणेकर, उज्ज्वला गायकवाड, प्रतिभा पाटील, वंदना मोरे,दर्शना कानडे, स्मिता भणगे, माया माणगावकर,
सुचिता नाईक,अनुपमा दळवी,अश्विनी चौघुले, ज्योती देसाई, वंदना शिरसागर,वंदना कांबळे यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात उपस्थित होत्या.या कार्यक्रमात आनंद घेतला. यावेळी मंदा पाटील म्हणाल्या, भोंडल्याचे महत्व पुढच्या पिढीला ही समजावे आणि आपली परंपरा जपण्याचाही प्रयत्न आम्ही करतो.