आजदे प्रभाग भाजपचा बाल्लेकिल्ला..

 


सूर्यकांत माळकर यांचा विश्वास 


डोंबिवली \ शंकर जाधव - कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असून पालिकेने प्रभागनिहाय आरक्षण काढले. डोंबिवली पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील आजदेगाव प्रभाग क्र.१९ मधून भाजपा आपला उमेदवार तर शिंदेंची शिवसेना आपला उमेदवार उमेदवार उभे करतील. 



ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून खंबाळपाडा, आजदे, डोंबिवली एमआडीसी आणि सांगर्ली असे पॅनल आहे. यातून भाजपा व शिंदेंची शिवसेना यांच्या सरळ लढत होईल. भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांना विचारले असता ते म्हणाले, आजदे हा भाजपचा बाल्ले किल्ला असून येथून भाजपचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा मला विश्वास आहे.



मी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षापासून भाजपचे काम आहे.त्यामुळे जनतेची कामे केल्याने भाजपाचा उमेदवार नक्की निवडून येईल असे सांगत आहे. माळकर यांनीग्रामपंचायत, जिल्हापरिषद निवडणूक लढविल्या असून लोकसभा, विधानसभा आणि पदवीधर निवडणूक होत असताना माळकर हे मंडळ अध्यक्ष होते. एवढा दांडगा अनुभव असतानाही आपण पालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात का असे विचारले असता ते म्हणाले, माझी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. पण पक्ष ठरवितील तोच माझा निर्णय असेल. 


भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाणवा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब यांनी जर मला संधी दिली तर आजदे प्रभागातून भाजपामधून नक्की निवडून येईन असा विश्वासही माळकर यांनी बोलताना व्यक्त केला.






Post a Comment

Previous Post Next Post