महिलांसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षणाचे आयोजन



अलिबाग (धनंजय कवठेकर) : गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्या माध्यमातून आणि ग्रुप ग्रामपंचायत खानाव, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने दिनांक २० ते २४ ऑक्टोबर रोजी धसाडे कुणे, खानाव, नाईक कुणे, कंटक कुणे, घोठवडे येथील आसपासच्या गावातील महिला व किशोरवयीन मुलींसाठी पाच दिवस मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दुपारी ठिक 2:00 ते 4:00 या वेळेत करण्यात आले आहे. 

या शिबिराचा जास्तीत-जास्त मुलींनी व महिलांनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होऊन या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आव्हान गेल इंडिया लिमिटेड, उसर व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post