डोंबिवली ( शंकर जाधव ) : मागील १० वर्षात आमदार असताना व नसताना देखील सातत्यपूर्ण सामाजिक कार्य केल्याने जनमानसात मी वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना, विविध कार्यक्रम, उपक्रम, सण - उत्सव भाजप व नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. याबाबत कल्याण पश्चिम विधासभा क्षेत्रात अनेक चौकात बॅनर लावण्यात आले आहे. सदरचे बॅनर फडण्याचे प्रकार मानसिक विकृती असलेल्या काही महाभागांकडून गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. दरम्यान असे प्रकार घडवून राजकीय व सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने याची गंभीर दाखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवेदनाव्दरे केली आहे.
भाजपचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र पवार माध्यमातून दरवर्षी राबविला जाणारा १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी मोहने – टिटवाळा व कल्याण पश्चिम विभागात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे कल्याण पश्चिम व मोहने – टिटवाळा विभागात माजी आमदार पवार यांच्यावतीने बॅनर लावण्यात आले होते. या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे कल्याण पश्चिमेतील केसी गांधी शाळा व बैलबाजार चौकातील बॅनर काही अज्ञातांनी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी फाडले. या घटनेबाबत माजी आमदार पवार यांच्यावतीने कार्यकर्त्यांनी तात्काळ कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पुन्हा गणेशोत्सव व नवरात्री सणाला देखील टिळक चौक, शिवाजी चौक, डीबी चौक येथील बॅनर देखील अद्यात व्यक्तींनी फाडले. या वारंवार घडणार्या घटनामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस व ठाण्याचे पोलिस आयुक्त अशितोष डुंबरे यांना पत्रव्यवहार करून या पद्धतीने राजकीय व सामाजिक शांतातेचा भंग करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राजकीय प्रवासात भाजपच्या माध्यमातून कायम जनता केंद्र बिंदू मानून केलेल्या कामामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून मला सन २०१४ साली जनसेवेची प्रथम संधी मिळाली. यानंतर २०१९ साली महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी अपक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी मला जनतेने दोन क्रमांकांची मते देऊन माझ्या निस्वार्थी कार्याचा सन्मान केला. यानंतर आमदार नसताना देखील मी ५ वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू ठेवला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुणवंत विद्यार्थी सन्मान, शासकीय योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम, कोरोना काळात नागरिकांना विविध कार्याव्दरे मदत आदीकार्यातून जनतेची सेवा केली आहे. यामुळे मला जनतेचे समर्थन आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे असे प्रकार फक्त मानसिक विकृती असेलेलीच माणसे करू शकतात असे नरेंद्र पवार यांनी म्हटले आहे.