डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात प्रचार करीत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या हस्ते आडीवली समर्थ नगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तालुका प्रमुख मुकेश पाटील, सुखदेव पाटील, माजी सरपंच राजेश फुलोरे, शाखा प्रमुख धनंजय शिंदे, उप शाखाप्रमुख श्रीधर सावंत, शंकर सनस, संदीप सुर्यवंशी, विद्याधर सावंत, जयेश पाटील, मयूर शिंदे, दिग्विजय थोरात, रोहन शिंदे, राहुल काकडे, पांडुरंग कदम, तुषार परब, भगवान जाधव, नितीन राऊत, अंकुश कदम आदी उपस्थित होते.