अलिबाग (धनंजय कवठेकर): महाराष्ट्र राज्य ५०व्या कुमारगट (ज्युनिअर) मुले - मुली अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेसाठी रायगडाचे मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. २७ ते ३०ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे खेळली जाणार आहे.
रायगड जिल्ह्याचे कुमार-मुली संघ निवडी करिता जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पनवेल यांच्या आयोजनाखाली आयोजित करण्यात आली होती. त्यातून रायगडचे संघ निवडण्यात आले.
रायगड जिल्ह्याचे संघ :
मुलांचा संघ :- जय घाडगे, गौरव टेंबे, कु. भावेश गोविलकर(ना. म. जोशी विद्याभवन क्रीडा संघ,गोरेगाव) ध्रुव मोकल, दिपेंद्र पाटील, सुजल मोकल(महात्मा गांधी क्रीडा मंडळ,हाशिवरे) , हिमेश म्हात्रे, साई थळे, पियुष पाटील(ओम साई, सानेगाव) सर्वेश गायकर, ओमकार सावंत, सिद्धार्थ पडवळ(तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पेण) , मासूम मुजावर, विघ्नेश पाटील (वायुदूत क्रीडा केंद्र, पनवेल) , प्रतीक जाधव(आशीर्वाद ॲग्नल, कामोठे) राखीव :- सुमित गजने (आशीर्वाद ॲग्नल, कामोठे) विकी जोशी (बंदरकाठा क्रीडा मंडळ, तळा) विवेक म्हात्रे(महात्मा गांधी क्रीडा मंडळ,हाशिवरे).
प्रशिक्षक - लावण्य मगर(पनवेल)
व्यवस्थापक - अक्षय मोरे(रोहा)
मुलींचा संघ :- वैष्णवी थोरात, संजीवनी जगदाळे, श्रेया पोळ, प्रज्ञा गाडे(वायुदूत क्रीडा केंद्र, पनवेल) दिक्षा पाटील, कु. साक्षी शेट्टी, कु. लावण्या म्हात्रे, अनया अरसूल(जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पनवेल) तृप्ती टेंबे, उपासना शिगवण, सायली टेंबे(ना. म. जोशी विद्याभवन क्रीडा संघ,गोरेगाव) ज्ञानेश्वरी कुपाडे, प्रतीक्षा तालीकोटे(ब्रुडर्स स्पोर्ट्स, कळंबोली) निधी गावंड(महात्मा गांधी क्रीडा मंडळ,हाशिवरे) सौम्या केणी(रुद्र क्रीडा संस्था, अलिबाग) राखीव :- निहारिका मुंढे(वायुदूत क्रीडा केंद्र, पनवेल) श्रीया भगत(जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पनवेल) श्रावणी कचरे(वायुदूत क्रीडा केंद्र, पनवेल)
प्रशिक्षक - समीर म्हात्रे(पनवेल)
व्यवस्थापीका- मीनाक्षी म्हसकर(पनवेल)raj