२८ ज्येष्ठ, ५ दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क



कल्याण, ( शंकर जाधव) : मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीही ८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदारांसाठी व दिव्यांग मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २८ ज्येष्ठ मतदारांनी व ५ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती १४४- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली.

उर्वरित एक ज्येष्ठ मतदार गंभीर आजारी असल्यामुळे मतदान करू शकले नाहीत. ४० टक्के अंपगत्व (Locomotive) व ८५ वर्षांवरील वृद्ध यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत  घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी विधानसभा निवडणूक २०२४ ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे १२ D‌ फॉर्म भरून दिले होते त्यापैकी पात्र मतदारांनी रविवारी टपाली मतदान करुन आपला अधिकार बजावला.





Post a Comment

Previous Post Next Post