डोंबिवली ( शंकर जाधव ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.
ठाणे जिल्ह्यात १३४-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), १३५-शहापूर (अ.ज.), १३६-भिवंडी पश्चिम, १३७-भिवंडी पूर्व, १३८-कल्याण पश्चिम, १३९-मुरबाड, १४०-अंबरनाथ (अ.जा.), १४१-उल्हासनगर, १४२-कल्याण पूर्व, १४३-डोंबिवली, १४४-कल्याण ग्रामीण, १४५-मीरा - भाईंदर, १४६-ओवळा- माजिवाडा, १४७-कोपरी- पाचपाखाडी, १४८-ठाणे, १४९-मुंब्रा -कळवा, १५०-ऐरोली, १५१-बेलापूर असे १८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
ठाणे जिल्ह्यात दि.२९ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ३८ लाख ४५ हजार ४२, महिला मतदार ३३ लाख ८२ हजार ८८२, इतर/तृतीयपंथी मतदार १ हजार ४१५ आहेत. तसेच यामध्ये सैनिक मतदार १ हजार ६०३, एनआरआय मतदार ९७९, दिव्यांग ३८ हजार १४९, १८-१९ वयोगटातील १ लाख ७२ हजार ९८१ मतदार तर ८५ पेक्षा अधिक वयोगटातील ५६ हजार ९७६ मतदार आहेत.
तरी, पात्र मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने दि.२० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
.jpeg)