शिक्षक पात्रता परिक्षा १० नोव्हेंबरला

 



अलिबाग, (धनंजय कवठेकर) : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवारी (दि.१०) शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.७) आढावा घेण्यात आला.


रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा पनवेल तालुक्यातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकुर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. 


परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत. गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post