Maharashtra assembly elections 2024 : 'आम्ही फुले नसून अग्नी आहोत, आमच्या बोटात शक्ती आहे'



अभिनेता श्रेयस तळपदे , पद्मिनी कोल्हापुरे यांचे नागरिकांना मतदानाचे आवाहन 

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृतीवर अधिक भर दिला आहे. यामध्ये सिने कलाकारांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. नुकताच पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रेयस तळपदे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकांना त्यांचे मत आणि मतदार सहभागाबद्दल माहिती देण्यासाठी मुंबईत निवडणूक रॅलीत सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. 

 रॅलीदरम्यान श्रेयस तळपदे यांनी मतदानावर भर दिला. आपण लोकशाहीचा भाग आहोत याची जाणीव लोकांना करून दिली. 'आपल्या राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या दिवसातून १० मिनिटे काढून मतदान करावे, असे आवाहन करत 'आम्ही फुले नसून अग्नी आहोत, आमच्या बोटात शक्ती आहे', आपले बोट वापरा अशी शेरेबाजी देखील तळपदे यांनी केली. 



पद्मिनी कोल्हापुरी यांनी जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. पद्मिनी कोल्हापुरी म्हणाल्या, 'मी सर्वांना विनंती करते की २० नोव्हेंबरला या आणि मतदान करा. महाराष्ट्रातील आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या रॅलीत लोकांनी मराठीत ‘काम सोडा, मतदान हे पहिले काम’ अशा घोषणा दिल्या.





#maharashtra assembly elections 2024 #shreyas talpade #padmini kolhapure #bollywood actor

Post a Comment

Previous Post Next Post