मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक संस्थेमार्फत गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन


शिवबा राजं प्रतिष्ठानने पटकाविला प्रथम क्रमांक 

दिवा, (आरती परब) :  दिव्यातील मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक संस्थे मार्फत दिवा शहर अंतर्गत गडकिल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, शिव व्याख्याती सायली पाटील होते. तर तेव्हा अजित भगत, उमेश भारती, प्रशांत सुर्वे आणि विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच मराठा वॉरियर्स गड किल्ले संवर्धकचे संस्थापक/ अध्यक्ष राहुल खैर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दिवा शहरातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी किल्ले बांधणी स्पर्धेला १०४ स्पर्धकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जे स्वप्न गड किल्ले संवर्धक मराठा वॉरियर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मनात बाळगले आहे ते आता सत्यात उतरताना ते बघत आहेत. ते स्वप्न असे की छत्रपती शिवरायांचा इतिहास, गड किल्ल्यांचा इतिहास आणि संवर्धन म्हणजे काय, त्याची संपूर्ण माहिती नवीन पिढीला आता मिळते आहे.

प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले ते शिवबा राजं प्रतिष्ठान, किल्ले ( पन्हाळा - पावणखिंड - विशाळगड) रणसंग्राम, तर द्वितीय पारितोषिकचे मानकरी आई एकविरा ग्रुप (किल्ले मल्हारगड) तर तृतीय पारितोषिक अचानक मित्र मंडळ (किल्ले पद्मदुर्ग) आणि चतुर्थ पारितोषिक कोकण वॉरियर्स (किल्ले  सिंधदुर्ग) अशा सर्वांना मिळाले. तेव्हा विजेते मंडळांचे  खूप खूप अभिनंदन ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. तसेच सहभागी मंडळांचे सुध्दा खूप खूप अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




Post a Comment

Previous Post Next Post