The retail inflation rate: ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाई दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला


 

 १४ महिन्यांत प्रथमच आरबीआयच्या श्रेणीबाहेर

नवी दिल्ली :  भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्क्यांवर पोहोचला होता. जो मागील महिन्याच्या नऊ महिन्यांतील उच्चांक ५.४९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामध्ये शहरी महागाई ४.६२ % वरून ५.६२% पर्यंत वाढली, तर ग्रामीण भागात गेल्या वर्षी याच महिन्यात ५.१२% च्या तुलनेत ६.६८% ने वाढ झाली. महागाई दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती.  ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई १४ महिन्यांत प्रथमच, म्हणजेच, ऑगस्ट २०२३ नंतर प्रथमच, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या ६ टक्क्यांवर पोहोचला. 


मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्क्यांवर पोहोचला, जो मागील महिन्यात ५.४९ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई देेखील वाढली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सहिष्णुता बँडची वरची पातळी त्याने ओलांडली आहे. भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमतीमुळे किरकोळ महागाईत वाढ झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबरमधील ३५.९९% च्या तुलनेत दरवर्षी किमती ४२.१८% ने वाढल्या. 

 ऑक्टोबर २०२३ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ४.८७ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून १०.८७ टक्के झाली होती, जी सप्टेंबरमध्ये ९.२४ टक्के आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात ६.६१ टक्के होती.


आरबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला मुख्य अल्प-मुदतीचे कर्ज दर अपरिवर्तित ठेवले होते, सरकारने महागाई २ टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांवर राहील याबाबत प्रयत्न सुरू केले होते.  




Post a Comment

Previous Post Next Post