डोंबिवली ( शंकर जाधव) : राज्यातील विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे - पाटील यांनी सुरुवातीला आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या आदेशानुसार डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजाकडून गणेश कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यानंतर जरांगे - पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार उमेदवार गणेश कदम यांनी सोमवार 4 तारखेला डोंबिवलीतील स.वा.जोशी शाळेतील निवडणूक निर्णय कार्यालयात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील आपला उमेदवार अर्ज मागे घेतला.
