३५ वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव संपन्न




ठाणे :  श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ३५ वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धा शनिवारी संस्थेच्या क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडली.  या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण १४ व ४९ अशा ६३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे अशोक उतेकर (कळवा पोलीस स्टेशन प्रमुख) , विशेष अतिथी कमलाकर पाटील (अध्यक्ष अखिल भारतीय शरीरसौष्ठव संघटना) , अमित नांदगावगकर (अध्यक्ष - ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव संघटना) व  कौस्तुभ कुलकर्णी (न्यू इंडिया इन्शुरन्स ठाणे विभाग जिल्हा प्रमुख) हे उपस्थित होते.  त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, खजिनदार रिक्सन फर्नांडिस, चिटणीस  रमण गोरे,  उप चिटणीस संतोष सुर्वे, सहचिटणीस  चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस् पॅट्रिक फर्नांडीस  व विश्वस्त केशव मुकणे हे उपस्थित होते.


सदर स्पर्धेत अंतर्गत  "श्री मावळी मंडळ श्री" किताब किशोर सीताराम जाधव याने पटकविला. तर, जिल्हास्तरीय "श्री मावळी मंडळ श्री" किताब ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे या व्यायाम शाळेच्या करण श्रवण ठाकूर याने पटकविला. या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद श्री मावळी मंडळ ठाणे (१४ गुण),  तर सांघिक उपविजेतेपद  ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे (१२ गुण) यांना मिळाले.


या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:

१. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता - यश दीपक दळवी (ऑलीम्पिया जिम, कल्याण)

२. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता - श्रेयश दिलिप खाडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)


गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे :

जिल्हास्तरीय निकाल :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):

क्रमांक १ -  पुरुषोत्तम मारुती इरनक (देवा जिम, कल्याण)

क्रमांक २ - दीपक प्रकाश ठाकूर  (जे  के फिटनेस, कल्याण)

क्रमांक ३ -  अविनाश रवींद्र सु्वांगीया  (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे) 

क्रमांक ४ - प्रतीक रामनाथन अय्यर (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)

क्रमांक ५ - सागर टेकबहादूर विश्वकर्मा (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)

क्रमांक ६ - स्वप्नील सुरेश वाघमारे (अपोलो जिम, कळवा)    

क्रमांक ७ - फेरोज हुसेन पठाण (समीर फिटनेस, ठाणे)


गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट )

क्रमांक १ - करण श्रवण ठाकूर  (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे) 

क्रमांक २ - आझाद राजेश जैनवाल (अपोलो जिम, कळवा) 

क्रमांक ३ - कलाम युसुफ शेख (कै  बी आर  मोकाशी, विटावा)

क्रमांक ४ - राजकुमार हरिदास पाटील (शाहु जिम, भिवंडी)

क्रमांक ५ - सलीम उद्दीन  (युनिव्हर्सल फिटनेस सेंटर, भिवंडी)

क्रमांक ६ - राकेश धामण धामणकर  (कै  बी आर  मोकाशी, विटावा)

क्रमांक ७ - परशुराम अशोक कांबळे (राधे कृष्ण हेल्थ क्लब, कल्याण )


गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ - मुंजा श्रीरंग मुळे (एम पॉवर फिटनेस, उल्हासनगर)

क्रमांक २ - किशोर सीताराम जाधव (श्री मावळी मंडळ, ठाणे)

क्रमांक ३ - पुलकेश प्रभास खनरा (मोन्स्टार फॅक्टरी जिम, ठाणे)

क्रमांक ४ - प्रथमेश विनायक म्हात्रे (समीर फिटनेस, , ठाणे)

क्रमांक ५ - शेलराज रोहिदास जाधव (माउली क्रीडा मांडा, टिटवाळा) 

क्रमांक ६ - सुमित रमेश भगत (श्री मावळी मंडळ, ठाणे)

क्रमांक ७ - उमेश रामचंद्र दाभेकर (श्री मावळी मंडळ, ठाणे)


गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट ):

क्रमांक १ - भूषण किसन पाटील (अपोलो फिटनेस, भिवंडी ) 

क्रमांक २ - इम्रान अन्वर शेख (हशिम जिम, मुंब्रा)

क्रमांक ३ - श्रेयश दीलीप खाडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)

क्रमांक ४ - यश दीपक दळवी  (ऑलीम्पिया जिम, कल्याण)

क्रमांक ५ - करण दिलीप चौधरी  (माउली क्रीडा मांडा, टिटवाळा) 

क्रमांक ६ - राहील इस्माईल शेख  (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)

क्रमांक ७ - संदेश संतोष चव्हाण (अपोलो जिम, कळवा) 


अंतर्गत स्पर्धा :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):

क्रमांक १ - महेंद्र अनंत शिंगाडे 

क्रमांक २ - आदित्य प्रकाश समेळ   

क्रमांक ३ - वीरू केशव बकावडे    

क्रमांक ४ - राजेंद्र प्रकाश दायगुडे  


गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):

क्रमांक १ - अल्फान इलिहास कुरेशी 

क्रमांक २ - पंकज अनंत भोईर 

क्रमांक ३ - सिद्धेश विलास उतेकर 

क्रमांक ४ - आर्यन संतोष चव्हाण  


गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ - किशोर सीताराम जाधव   

क्रमांक २ - उमेश रामचंद्र दाभेकर  

क्रमांक ३ - प्रतीक बेनोसे 

 

गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट):

क्रमांक १ - सुमित रमेश भगत  

क्रमांक २ - ओंकार दिनेश उतेकर

क्रमांक ३ - जाहिद शेख   


  




Post a Comment

Previous Post Next Post