डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीमध्ये विनामूल्य प्रशिक्षण



डोंबिवली :  अंगावर वर्दी घालून देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींचे स्वप्न पूर्णत्वास अवतरण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीची स्थापना केली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 


 

देशावर प्रेम असणाऱ्या कोणत्याही तरुणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये, कोणत्याही तरुणाला आपल्या स्वप्नाचा त्याग करावा लागू नये याकरिता आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ‘डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडेमी’ची स्थापना करण्यात आली. या अकॅडमीच्या माध्यमातून देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींना लेखी आणि मैदानी अशा दोन्हीही प्रकारचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. जे प्रशिक्षण हजारो लाखो रुपयांची फी भरून दिलं जातंय तेच नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.


देशसेवेचा वसा उरी बाळगून पुढे जाणाऱ्या विद्यार्थांना या अकॅडमीच्या माध्यमातून उत्तम दर्जेदार असे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देत त्यांच्या पंखांना बळकटी देण्याचे काम आ. रवींद्र चव्हाण करत आहेत. एवढंच नाही तर या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकडे रवींद्र चव्हाण स्वतः एका पालकाप्रमाणे जातीने लक्ष देण्याचे काम देखील करत आहेत. 

 

देश सेवेत आपल्या डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातून अनेक तरुण-तरुणी सहभागी व्हावे आणि डोंबिवलीचे नाव देशाच्या इतिहासात मानाने घेतले जावे हे आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वप्न डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.  या अकॅडमीत सामील होऊन आपले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन आ. चव्हाण यांनी केले आहे.


या अकॅडमीतून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करत विविध दलात प्रवेश मिळविला आहे. यामध्ये सुशील कनोजिया - CISF, रितेश तायडे - CRPF श्रीनगर, संतोष उत्तरवाड - SRPF पुणे, मुकर्रम शेख - SRPF जालना, मयुरेश कदम - अग्निविर, निलेश उघडे - ठाणे गृहरक्षक दल, सौरभ शेळके - ठाणे गृहरक्षक दल, विजया वळवी - धुळे वनरक्षक दल, तेजस्विनी पाटील - लातूर अग्निशमन दल, गोविंद गायकवाड - नांदेड पोलीस, विकास पंडित - नांदेड पोलीस, सीताराम सोवने - पिंपरी-चिंचवड पोलीस, अमोल अहिरे - मीरा-भाईंदर पोलीस, सोनी भुरे - ठाणे शहर पोलीस, सोमनाथ हिंगमीरे - ठाणे ग्रामीण यांच्यासह आदी विद्यार्थी विविध दलात रुजू झाले आहेत. 






Post a Comment

Previous Post Next Post