५४ ग्रॅमची एमडी पावडर जप्त
दिवा, ( आरती परब) : दिवा परिसरात एक इसम अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार एक इसम संशयितरित्या फिरत असताना निदर्शनास आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. याप्रकरणी सुरज रामविलास शर्मा (३४) याच्याजवळ अंदाजे एक लाख ३५ हजाराची ५४ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली.
सदर आरोपीस ताब्यात घेऊन तपासाअंती त्याचे नाव सुरज रामविलास शर्मा (३४) असल्याचे समजले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि पाचोरकर तसेच दिवा तपास पथकाचे सपोनि तोरडमल, सपोनि कोळेकर, पो ना किशोर वैरागकर, पो शि. गायकवाड, पो शि जाधव, पो शि तडवी, पो शि सातपुते यांना कारवाई करण्यास आदेशित करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदरचे पथक दिवा परिसरात सापळा रचला असता गणेश तलाव जवळ गणेश नगर, आगासन रोड, दिवा पुर्व येथे एक इसम संशयितरित्या फिरत असताना निदर्शनास आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ अंदाजे ५४ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. त्याची किंमत अंदाजे एक लाख ३५ हजार आहे.