डोंबिवली ( शंकर जाधव ) : शहरातील लोकांच्या मागणीनुसार मेडकाइंड फार्मसी कंपनीने त्यांची दुसरी शाखा डोंबिवलीत सुरू केली. या मेडकाइंड फार्मसीच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यासह माजी नगरसेवक रवी पाटील, संजय पावशे, संतोष चव्हाण, संजय निक्ते,गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे आदी उपस्थित होते.गरजू लोकांसाठी या शाखेचा फायदा किफायतशीर दराने मिळेल अशी व्यवस्था संचालकांनी करावी असे मत आमदार मोरे यांनी यावेळी सांगितले.
पूर्वेकडील शॉप नं. ६, रघुराम को.ऑप. हौ. सोसायटी, शिवमंदिर रोड, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे मेडकाइंड फार्मसी माध्यमातून दुसरी शाखा सुरू केली आहे. या शाखेच्या उदघाटनप्रसंगी आमदार राजेश मोरे, कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली सचिव संतोष चव्हाण, माजी नगरसेवक रवी पाटील, बाळा म्हात्रे, नितीन मिरजकर व लांडगे कुटुंबासह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने मेडकाइंड फार्मसीच्या दुसऱ्या शाखेत पुरोहितांच्या मार्गदर्शनाने यथासांग गणेशपूजा करण्यात आली.
त्यानंतर फित कापून व नारळ वाढवून राजेश मोरे व गोपाळ लांडगे यांनी शाखेचे उदघाटन केले. दरम्यान शाखेत ॲलोपेथिक, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, सर्जिकल, जेनेरिक अशी सर्व प्रकारची औषधे मिळणार असून शाखा चोवीस तास उघडी असेल असे सांगून नितीन मिरजकर यांनी आमदार राजेश मोरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यांनी सत्कार केला. त्यानंतर आपल्या या फार्मसीच्या शाखेतून गरजू लोकांना नक्कीच समाधान मिळेल असे सांगून मोरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेडकाइंड फार्मसीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली.