अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचा सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी असलेला ३७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना सोमवारी १६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांसह इतर सर्वांनीच शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायत खंडाळे सरपंच नाशिकेत कावजी, मुंबई पोलीस अधिकारी निलेश मोहिते, मांडवा सागरी पोलीस निरीक्षक दिपक भोई, मापगाव माजी उपसरपंच वसीम कुर, रायगड पोलीस दलातील पोलीस डॉग स्कॉडचे संतोष रुत, राजिप शिक्षक चेतन कोळी, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, किहीम भिलेश्वर सर्व पदाधिकारी, आई फाउंडेशनचे सागर पवार, माजी सदस्य सुदेश समेळ, अलिबाग पोलीस अधिकारी वर्ग, किहीम उपसरपंच मिलिंद पडवळ, किहीम ग्रामपंचायत सदस्या कल्पिता आमले, स्नेहा आर्ते, जागृती जरंडे, निधी काठे, अमिता वाघे, अलिबाग तालुका महावितरणचे वरिष्ठ अधिकारी कमलाकर अंबाडे, चोंढी विभागीय महावितरण अधिकारी अनुप इंगळे, माजी रायगड जि.प. सदस्य काका ठाकूर, उद्योजक अक्षय वेलणकर, उद्योजक मूदसर कुर, उद्योजक झेन पेडर, जेएसडब्ल्यूचे अधिकारी मिलिंद जोशी, वाहतूक पोलीस अधिकारी शिंदे, ठाकूर, श्री. नरेंद्र महाराज नाणीज संस्थानाचे चोंढी विभाग सेवेकरी भाग्यश्री पवार, गुरुमाऊली नवनाथ जोगे(राजेशिर्के), रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शेणवई येथील रोहा तालुका संघटक शुभम राजेशिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कोलाड विभाग अध्यक्ष राकेशशेठ शिंदे, मुशेत पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे तसेच रायगड जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळांचे पदाधिकारी, विविध महिला मंडळ व महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सामाजिक व राजकीय, शासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा तसेच नातेवाईक, मित्रपरिवार, चाहते, पत्रकार बंधू आणि अलिबाग तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, चोंढी पंचक्रोशीतील सर्व स्तरातील मुले, मुली तसेच महिला व पुरुष ग्रामस्थांसह अनेकांनी सकाळपासूनच त्यांच्या चोंढी येथील राहत्या घरी पुष्पगुच्छ व भेटवस्तू घेऊन तर काहींनी वाढदिवसानिमित्त स्वतः वैयक्तिक केक घेऊन शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे पिंट्या गायकवाड यांनी आपल्या कुटुंबासह परहूर येथील श्री. समर्थ वृद्धाश्रम येथे जाऊन वृद्धांसोबत वाढदिवस साजरा केला, यावेळी सर्व वृद्धांना खाऊचे वाटप करत वृद्धांचे आशिर्वाद घेतले. वृद्धाश्रमाचे कार्यकारी संचालकगुंजाळ यांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांची तोंड ओळख करून देतांना बरेचसे वृद्ध हे एकेकाळी किती सर्व सुख संपन्न होते व आज ते आपल्या कुटुंबापासून विभक्त झाल्यामुळे कितीतरी यातना सहन करत ते आज वृद्धाश्रमात दाखल झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. आपलाच मुलगा, मुलगी आपला कुटुंब आज त्यांची त्यांच्या उतरत्या वयात काळजी घेत नसल्याने त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेले आहेत, अशी ॲड. गुंजाळ यांनी ही विदारक व दुःखदायक माहिती देत असताना उपस्थित सर्वच भावुक झाले होते, यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. यावेळी पिंट्या गायकवाड यांनी ॲड. गुंजाळ यांचे सर्व वृद्धांची सर्व प्रकारची मनोभावे काळजी घेत असल्याबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले व यापुढेही सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडे आपल्या परीने आर्थिक मदत सुपूर्द केली. याप्रसंगी वृद्धाश्रमाला भेट देताना पिंट्या गायकवाड यांच्यासोबत त्यांचे वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड, मुलगी प्राप्ती गायकवाड, भाची आर्वी पाटील, नदीम आत्तार, विजय मोरे व इतर मित्रपरिवार उपस्थित होते. तद्नंतर पिंट्या गायकवाड यांनी चोंढी येथील प्रसिद्ध जिलेबीवाले अशी ओळख असणारे 'पाटील हॉटेल'चे मालक तथा ज्येष्ठ नागरिक पाटील यांच्या परहूरपाडा येथील निवासस्थानी जाऊन आशिर्वाद घेतले.
सदर रात्री उशिरापर्यंत वाढदिवसानिमित्त पिंट्या गायकवाड यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.