मेडिकल दुकानवर हेतूपूर्वक कोणतीही कारवाई होणार नाही

 



डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे रामनगर पोलिसांना निवेदन 

आमदार राजेश मोरे, जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे उपस्थित 

सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांचे आश्र्वासन


डोंबिवली ( शंकर जाधव ) : औषध विक्रेत्यास पोलिसांकडून जबरदस्ती दुकानातून बाहेर काढत दुकान बंद करण्याच्या निषेधार्थ डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मेडिकल दुकानदारांनी सोमवारी डोंबिवली रामनगर पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आमदार राजेश मोरे, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित होते.

  



सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी यावेळी मेडिकल दुकानवर भविष्यात हेतूपूर्वक कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. पोलीस प्रशासनाकडून संघटनेच्या सर्व मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी, सचिव संजू भोळे, रेवाशंकर गोमतीवाल, विलास शिरूडे, राजेश कोरपे, लीना विचारे यांनी यावेळी प्रशासन समवेत चर्चा केली. रात्रीच्या वेळी दुकानासमोर ग्राहकांची जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती प्रशासनाने यावेळी केली. नशेखोर यांची दिवसेंदिवस गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्यावर अंकुश बसने आवश्यक असल्याचेही पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी यावेळी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post