महिला प्रवाशांकरीता डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचा ' स्मार्ट सहेली ग्रुप'

 



डोंबिवली  ( शंकर जाधव ) : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या  महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाने ' स्मार्ट सहेली ग्रुप' बनविला आहे. हा ग्रुपच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा कशी मिळेल याची माहिती देण्याकरिता डोंबिवली रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पावशे आणि महिला शिवसैनिक रश्मी गव्हाणे यांनी पुढाकार घेत महिलांनाही या ग्रुपबाबत माहिती देत पोलिसांचे आभार मानले.




    रेल्वे प्रवासा दरम्यान  प्रवासी महिलांना आधार म्हणून डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचा ' स्मार्ट सहेली ग्रुप'  मदतीला धावून येईल. यासाठी १३९ या नंबरवर मोबाईल कॉल केल्यास स्मार्ट सहेली ग्रुपची  महिलांना मदत मिळेल. अशा या उपक्रमाचा महिलावर्गाला निश्चित फायदा होणार असल्याचे पोलिसांनी विश्वास दर्शविला. या ग्रुपची माहिती देण्याकरिता जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना माजी नगरसेवक संजय पावशे व महिला शिवसैनिक यांनी पुढाकार घेत जनजागृती कार्यक्रमाला हजेरी लावली अशी माहिती डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी गजेंद्र रावत यांनी सांगितले. या ग्रुपमध्ये सात महिलांचा समावेश असून त्या तत्काळ महिलांना मदत करणार आहेत.



     रेल्वे प्रवसात  महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे जगते.या उपक्रमातून प्रवासी महिलांना तात्काळ मदत मिळेल  अपेक्षेने महिला नक्कीच संपर्क साधतील असा विश्वास या उपक्रमातून स्पष्ट होत आहे. याबाबत संजय पावशे म्हणाले, महिलांच्या सेवेसाठी शिवसैनिक नेहमी आघाडीवर असतात. आमचा हा महिला गट समस्याग्रस्त महिलांना नक्कीच मदत करेल. या ग्रुप मध्ये सहभागी महिला शिवसैनिक रश्मी गव्हाणे म्हणाल्या, असा ग्रुप प्रत्येक स्थानकावर केला तर त्याचा महिलांना फायदा होईल.




Post a Comment

Previous Post Next Post