अलिबाग, (धनंजय कवठेकर): अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील पुरुष व महीना कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून रायगडचे पुरुष व महिला कुस्ती संघ निवडले जाणार आहेत. हे रायगडचे कुस्ती संघ महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सहभागी होतील.
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था व हनुमान तालिम संघ वाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुनिल तटुकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र वाडगाव येथे या स्थर्धेचे आयोज करण्यात आले आहे. सब ज्यूनियर मुले सब ज्यूनियर मुली , खुला गट पुरुष गादी व माती, महिला खुलागट , पुरुष खुला गट ग्रिक्रोरोमन, बालगट मुले, बालगट मुली अशा गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे.
वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका गणेश पवार, माजी सरपंच सिताराम भगत, मधुकर भगत, सरिता भगत यांच्या उपस्थितीत रविवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयंद्र भगत, सरचिटणीस मारुती आडकर, कार्याध्यक्ष सुभाष घासे, उपाध्यक्ष भगवान धुळे, उपाध्यक्ष नंदू म्हात्रे, माजी अध्यक्ष बळीराम पाटील, तांत्रिक चिटणीस राजाराम कुंभार, सहतांत्रिक चिटणीस प्रमोद भगत, पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरीश्चंद्र शिंदे, खारापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक डॉ. सुनिल पाटील , महाड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष वैभव सकपाळ, केशव पाटील, चंद्रकांत भगत, निलीमा भगत, दिलीप कचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.