डोंबिवली ( शंकर जाधव) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवली पूर्वकडील बाजीप्रभू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महामानवाला विनम्र अभिवादन केले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बहुसंख्येने त्यांचे अनुयायी उपस्थित होते. गेले अनेक वर्ष मी देखील या महामानवास वंदन करण्याची परंपरा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंडित ठेवून मी देखील जातीने उपस्तिथी लावली. अनेक नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसेच भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महामानवास मानवंदना केल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.