अलिबाग येथे पत्रकारांची कार्यशाळा संपन्न

Maharashtra WebNews
0

 



अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : विविध विभागांमार्फत आयोजित होणाऱ्या कार्यशाळा निरंतर शिकण्याचे माध्यम असतात, मात्र अनेकदा या कार्यशाळेबाबत लोकांचा दृष्टीकोन उदासिनतेचा असतो. ज्यावेळी आता मला काहीही नवीन शिकण्याची गरज नाही ,मी परिपूर्ण आहे, मला सगळे येत असे एखाद्या व्यक्तीला वाटू लागते. तेव्हापासून त्याच्या ऱ्हासाला सुरूवात होते. त्यामुळे निरंतर शिकण घेत राहणे ही काळाची गरज आहे. असे मत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. ते अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित पत्रकार कार्यशाळेत बोलत होते.


    चिंतामणराव केळकर विद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील शंभरहून अधिक पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.




     या जगात परिपुर्ण असे कोणीही नसते. ज्या व्यक्तीला प्रगती करायची असेल , त्यांना पुढे जायचे असेल, जगामध्ये काही चालले आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे. काहीतरी नवीन शिकायची गरज असते, पत्रकारीतेची साधने बदलत आहेत. त्यात गतीमानता येत आहे. त्यामुळे पत्रकारीतेतील बदल समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरतात असेही घार्गे यांनी


    पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. समाजातील वेगवेगळ्या लोकांचे भेटून, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम ते करत असतात. पत्रकारांनी मांडलेल्या प्रश्नामुळे समाजात जागरुकता निर्माण होते. त्यामुळे पत्रकारीतेचे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून असलेले महत्व नाकारता येणार नाही. सुजाण आणि सक्षम समाज घडवायचा असेल तर त्यासाठी जाणते पत्रकार निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी पत्रकारांच्या कार्यशाळा उपयुक्त ठरू शकतात असे मत


आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी व्यक्त केले. आपत्ती काळात रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रशासनाला मोलाची साथ दिल्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी यावेळी सांगितले. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम पत्रकारीतेच्या बदलत्या स्वरुपाबाबत यावेळी भाष्य केले.


   कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार वैभव चाळके यांनी बातमीची भाषा आणि व्याकरण याबाबत मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात मुंबई मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकारीतेच्या जगभरात असलेल्या संधी कशा हेरता येऊ शकतात याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात मानसोपचारतज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मनातील ताणतणावाचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी पत्रकारांना चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वार्डे आणि आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर यांनी तर आभार सचिव राजेश भोस्तेकर यांनी मांडले.  तसेच सूत्रसंचलन महेश पोरे आणि भारत रांजणकर यांनी केले.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)