शिवसैनिकामुळे धोकादायक पोल हटले

Maharashtra WebNews
0

 



आमदार राजेश मोरे यांचे नागरिकांनी मानले आभार 


डोंबिवली  ( शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील भाल गावाचे ग्रामस्थ तथा शिवसैनिक धनेश म्हात्रे यांनी धोकादायक अवस्थेतील  विजेचे खांब हटविण्याबाबत  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याकडे मांडला. आमदार मोरे यांनी  दखल घेवून हे काम मार्गी लागण्यासाठी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना समज देताच ताबडतोब काम परिपूर्ण झाले. धोकादायक पोल हटविल्यामुळे गावकऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले.


भाल ग्रामस्थ तथा शिवसैनिक धनेश म्हात्रे यांनी अत्यंत दुरावस्तेत  असलेल्या विजेच्या खांबाची तक्रार असलेले एक निवेदन पत्र आमदार राजेश मोरे यांना दिले होते. भाल गावात अत्यंत धोकादायक अवस्थेतील विजेच्या खांबामुळे समस्या निर्माण झाली होती. खराब खाब्यांमुळे खाली झुकलेल्या विजेच्या तारांमुळे अपघात होण्याची  शक्यता होती. भविष्यात भाल गावातील शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांना याच घोका पोहचू शकत होता. हा संभाव्य धोका ओळखून धनेश म्हात्रे यांनी याबाबतचे एक निवेदन जनसंपर्क कार्यालय (दत्तनगर) येथे आमदार मोरे यांना दिले होते. 




आमदार मोरे  यांनी त्वरित या विषयाच गांभीर्य ओळखून जातीने लक्ष घालून कामाला त्वरित सुरवात करण्याचे निर्देश संबंधित विजपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिले. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे धोका टळला आहे. या कामामुळे धनेश म्हात्रे यांच्या रूपाने एक तत्पर आणि कार्यक्षम नेता भाल गावाला मिळाला असल्याने भाल गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आता गावातील विकास कामे होतील असा विश्वास वाढत आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)