व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्याने भीतीचे वातारण
नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरात पुन्हा एकदा मेटा सेवा बंद झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री उशिरा व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले. यामुळे लाखो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचबरोबर आपले अकाऊंट हॅक तर झाले नसेल ना या भीतीने त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट DownDetector.com डाऊनडिटेक्टर.कॉमनुसार, फेसबुकच्या एक लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी आणि इंस्टाग्रामच्या सुमारे ७०,००० वापरकर्त्यांनी सेवा बंद झाल्याबद्दल तक्रार केली. मात्र, काही वेळातच फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा पूर्ववत झाली. यामुळे वापरकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यावर इन्स्टाग्रामने x च्या माध्यमातून याबाबत दिलगिरी व्यक्त करत काही तांत्रिक गडबडीमुळे ही समस्या निर्माण झाली होती. त्याचबरोबर शक्य तितक्या लवकर गोष्टी सामान्य करण्यासाठी काम करत असल्याचे म्हटले होते.
५०,००० हून अधिक Facebook वापरकर्त्यांनी लॉग इन करणे, पोस्ट अपलोड करणे याबाबत समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या. इंस्टाग्राम २३,००० हून अधिक वापरकर्त्यांसाठी डाउन होते, अनेकांना पोस्ट ॲक्सेस किंवा अपडेट करता आले नसल्याची तक्रार नोंदवली आहे. याशिवाय, युनायटेड स्टेट्समधील १२,००० हून अधिक वापरकर्त्यांनी ही समस्या नोंदवली आहे.