एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धेचे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजन !!
रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क नाही, सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश !!
पुणे, : फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मार्फत इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम आणि निर्णायक फेरी पुण्यामध्ये होणार आहे. भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्स या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. याच निमित्ताने टु-व्हिलरच्या डर्ट-रेसचा (मातीवरच्या शर्यतीचा) थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे. रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क आकारण्यात येणार नसून सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश असणार आहे.
या रोमांचकारी स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक तसेच ३ वेळेचा राष्ट्रीय रॅली चॅम्पियन आणि मानांकित ग्रेट डेझर्ट हिमालयन रॅलीजचा विजेता फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना यांनी सांगितले की, २०२४ मध्ये देशातील विविध रांज्यांमध्ये झालेल्या ५ प्राथमिक फेर्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी १४ आणि १५ डिसेंबर रोजी पुण्याजवळी कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे होणार आहे. या फायनल राऊंडसाठी प्रत्येक झोनमधून पात्र झालेले सुमारे १५० अव्वल रायडर्स सहभागी होणार असून या स्पर्धेत राष्ट्रीय अजिंक्यपद विजेता ठरणार आहे.
‘युरोग्रीप’ या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने या रॅली चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी प्रायोजक्त्व दिले असून या स्पर्धेसाठी रायडर्सना टायर कंपनीच्यावतीने देण्यात येणार आहे.
पुण्यामध्ये होणार्या अंतिम स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना फराद आणि चिन्मय म्हणाले की, राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले सचिन डी., नटराज, असद खान, रेहाना, सिनान फ्रान्सीस, राजेंद्र, स्टेफन रॉय, शामिम खान आणि सय्यद असिफ अली यांच्यात जेतेपदासाठी झुज
पहावयास मिळणार आहे. याशिवाय सुहैल अहमद, युवा कुमार, अमोद नाग, मुंबईचा बादल दोशी, पुण्यातील पिंकेश ठक्कर, हंसराज साईकिया, मधुरीया ज्योती राभा, बंटेलांग जयव्रा असे अव्वल आणि सर्वोत्तम १५० हून अधिक रायडर्स सहभागी होणार आहेत.
इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ११ क्लास (गट) असणार आहेत. या रॅली स्पर्धेत सांघिक अजिंक्यपद, रायडर्स ग्रुप ए, बी, बुलेट क्लास, स्कूटर क्लास, महिला गट, प्रौढ गट असे एकूण १२ गटाच्या विजेतेपदासाठी रायडर्स रेसिंग करणार आहेत. इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेतील टु-व्हिलर रॅली स्प्रिंट हा अतिशय रोमांचकारी मोटरस्पोर्ट शर्यत आहे. यामध्ये प्रत्येक टप्पा ६ ते १० किलोमीटरचा असतो. यामध्ये रायडर्सना मातीच्या, डांबरी ट्रकवर किंवा डोंगरातील उंच-सखल खडतर अशा रेसिंग मार्गावर आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करत अंतिम रेषा पार करावी लागणार आहे.