अलिबाग (धनंजय कवठेकर) : राजेंद्र बोराडे आणि आशा बोराडे संचालित सिगींगस्टार कराओके स्टुडिओमार्फत आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेत पेणची तेजश्री जोशी सुपर सिंगींगस्टार ठरली. तिला ट्रॉफीची देऊन गौरविण्यात आले.
१ डिसेंबर रोजी अलिबागमध्ये या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धसाठी अलिबाग,पेण ,पनवेल, महाड,जुई नगर,किहिम, नागाव,येथिल ७४ स्पर्धकानी आपला सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली, त्यातून ५५ स्पर्धक दुसरा फेरीत प्रवेश मिळाला. २५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
या स्पर्धेत सोलो गटात पेणचा करण म्हात्रे विजेता ठरला.पेझारी येथील समिधा कार्लेकर उपविजेती ठरली. तृतीय क्रमांक पेणच्या तेजश्री जोशी हिने पटकावला. शलाका पंडित हीने चतुर्थ क्रमांक मिळवला. पाचवा क्रमांक भावना घारु अणि मनोज जावळे यांना विभागून देण्यात आला.
डूएटमध्ये स्पर्धेत पेणच्या प्रदीप पाटील आणि तेजश्री जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक अलिबागच्या शलाका पंडित अणि अतुल नागावकर यांनी मिळवला. मनोज जावळे आणि भावना घारू यांनी तृतीय क्रमांक मिळवला. समिधा कार्लेकर आणि संदीप साठे यांनी चतुर्थ तर अमोल येरनकर आणि ऋतुजा पार्टे यांनी पाचवा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत सुपर सिंगींगस्टारची ट्रॉफी पेणची गायिका तेजश्री जोशी हिने पटकावली. अलिबागमधील गायक योगेश आग्रवाकर यांनी स्पर्धेला भेट देऊन आई तुझ देऊळ गाणे सदर केले.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे परीक्षक म्हणून अलिबाग गायिका अँड कला पाटील तर अंतिम फेरी साठी गायक यशवंत कुलकर्णी आणि राजेश शिरोडकर यांनी काम पाहिले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. स्टुडिओच्या संचालक आशा बोराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात कराओके स्टुडिओची माहिती दिली. स्टुडिओचे संचालक राजेंद्र बोराडे यांनी आभारप्रदर्शन केले.