सिद्धी वाकडेचा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी केला सत्कार
सोगाव, ( धनंजय कवठेकर ) : अलिबाग तालुक्यातील चोंढी - किहीम येथील सौंदर्यसम्राज्ञी सिद्धी वाकडे हिने नुकत्याच माटुंगा - मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आणखीन एक मानाचा प्रथम क्रमांकाचा मुकुट जिंकला आहे. तर इतर सौंदर्य स्पर्धेत दोन विजयी मुकुट मिळविले आहेत. गेल्या वर्षभरात तिने एकूण चार विजयी मुकुट जिंकण्याचा मान मिळविला आहे. यामुळे अलिबागकरांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. याबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
सौंदर्यसम्राज्ञी सिद्धी वाकडे हिने यापूर्वी विविध सौंदर्य स्पर्धेत, फॅशन शो, फॅशन वॉक, डान्स अशा अनेक स्पर्धेत सहभागी होत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. काही दिवसांपूर्वी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी माटुंगा - मुंबई येथे 'चतुर रागिणी' यांचा श्रावण महिन्यात वार्षिक महोत्सव संपन्न झाला, त्याबद्दलचा बक्षीस वितरणचा कार्यक्रम नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या 'मिस क्वीन ऑफ श्रावण मुंबई २०२४' या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सिद्धी वाकडे हिचे विजेती मुकुट, विजयचिन्ह आणि इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच मुंबई येथे ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या 'सितारों की महफिल' या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांचे हुबेहूब पोशाख परिधान करून फॅशन वॉक आणि नृत्य सादर केले, त्यामध्ये गंगुबाईचे पात्र सादर करणारी सिद्धी वाकडे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा - मुंबई येथे १५ डिसेंबर रोजी मिस सुपर इंडिया मॉडेल २०२४ हा फॅशन शो पडला, त्यामध्ये अलिबागची सिद्धी वाकडे हि द्वितीय क्रमांकाने विजयी झाली. गेल्या दोन महिन्यात सिद्धी वाकडे हिने तीन पदके मिळविली आहेत, तर गेल्या एक वर्षात तिने एकूण चार पदके मिळविली आहेत. याबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे, यामुळे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सौंदर्यसम्राज्ञी सिद्धी शाम वाकडे हिचा तिच्या चोंढी- किहीम येथील निवासस्थानी जाऊन कौतुक करत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. यावेळी पिंट्या गायकवाड यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.