नाशिक: नाशिककर कर्मचारी संघटना व सामाजिक संघटना यांच्यातर्फे कोकण विभागाचे अप्पर आयुक्त विवेक गायकवाड यांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पदी नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्याचा कार्यक्रम आज नाशिक येथे होणार असल्याची माहिती नाशिककर कर्मचारी संघटना व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष करुणासागर पगारे यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी. जी. वाघ (माजी जिल्हाधिकारी व साहित्यिक) यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्था नाशिक पुणे रोड, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउदेशीय संघटना महाराष्ट्र राज्य, परिवर्त परिवार, इंडिपेंडंट टीचर्स युनीयन मातृभूमी प्रबोधन समिती, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालाय व ग्रंथालय, समता शिक्षक परिषद मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त असोसिएशन नाशिक जिल्हा, अतः दीप:भव ग्रुप आणि फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था यांचा समावेश आहे.
हा सत्कार कार्यक्रम शनिवारी दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सभागृह, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे होणार आहे.