राधानगरी : सध्याचे युग म्हणजे डिजिटल मीडिया व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या माध्यमातून आजची युवा पिढी सह अनेक जण गुंतलेले दिसतात. या व्हाट्सअप आणि मोबाईल मुळे काय मिळणार आहे? अशीच चर्चा तुमच्या आमच्यात सुरू असते. काहीजण सोशल मीडियाचा, डिजिटल मीडियाचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात हेही तितकेच खरे असले तरी पण चांगल्या कामापेक्षा अनेकदा नुकसानच जास्त होत असल्याचे उदाहरणं या डिजिटल मीडियामुळे समाजासमोर पाहायला मिळतात. पण कधी कधी ह्याच सोशल मीडियाचा फायदा देखील करून देऊ शकते, हे मात्र नक्की असंच एक उदाहरण राधानगरी तालुक्यात घडलं. व्हॉट्सॲपमुळे चक्क तीन तोळ्याचे ब्रेसलेट मिळाले.
राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे युवराज एकल यांचे ब्रेसलेट राधानगरी तहसीलदार कार्यालयाबाहेर सकाळी ११ वाजण्याचे सुमारास हरवले होते. दिसभर युवराज एकल व त्यांचा मित्र परिवार ब्रेसलेटचा शोध घेत होते. पण ते मिळाले नाही. युवराज एकल यांच्या मित्रांनी व्हॉट्सॲपद्वारे स्टेट्स व मॅसेज ग्रुपवर पाठवले. व व्हॉट्सअप वरील स्टेट्स वाचून धामोड मधील राजाराम आण्णा तेली, किरण ईश्वरा ऱ्हायकर व ओमकार राजाराम तेली यांनी युवराज एकल यांना फोन केला व ब्रेसलेट मिळाले असल्याचे सांगितले व ते प्रमाणिक पणे परत केले.
आज-काल एखादं ब्लड ग्रुप हवे असेल तर आपण व्हॉट्सॲपवर टाकतो एखादी माहिती हवी असेल चांगली वाईट बातमी असेल तर ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल केली जाते आणि याला प्रतिसाद ही चांगला मिळतो समाजामध्ये आजही मदतीची भावना असल्याची या व्हॉट्सॲप ग्रुप वरून दिसून येते आजही असंख्य whatsapp ग्रुप हे चांगल्या समाजाच्या कामासाठी उपयोगी पडत असतात अनेक व्हॉट्सॲप ग्रुप हे समाजकार्याच्या हितासाठी वापरत असल्याचे पाहायला मिळते नेमका असाच प्रकार व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घडला आणि खरंच व्हॉट्सॲप हे समाज उपयोगी आहे हे सिद्ध झालं याचाच अर्थ डिजिटल मीडिया सोशल मीडिया याचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येऊ शकतो हे राधानगरी मधील घटनेवरून दिसून आल आहे.
ब्रेसलेट मिळाल्यावर युवराज एकल, साताप्पा बोडके, उत्तम बोडके, विठ्ठल चौगले, सुनिल चौगले, दिग्विजय पाटील यांनी तेली यांच्या धामोड येथील घरी जाऊन आभार मानले.