मराठी संस्कृतीचा जल्लोष
दिवा \ आरती परब : भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ, महिला मोर्चा आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “संस्कृती मराठी मातीतली, वारसा शिवरायांचा” या घोषवाक्याखाली आयोजित भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सपना रोशन भगत (महिला मोर्चा अध्यक्षा) आणि रोशन भगत (ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भाजपा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
दिवा पूर्व येथील ग्लोबल स्कूल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास नागरिक, पालक आणि बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी परंपरा, इतिहास आणि शिवकालीन संस्कृती जिवंत ठेवण्याच्या हेतूने आयोजित या स्पर्धेत लहान मुलांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांचे सुंदर आणि कलात्मक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रथम क्रमांक तिसाई मित्र मंडळ, गणेश पाडा, किल्ल्याचे नाव- अंकाई टंकाई यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक बक्षिस देऊन गौरवण्यात आले. तर द्वितीय क्रमांक विभागून दोन मंडळांना विभागून देण्यात आला. शिवबा राज प्रतिष्ठान, बेडेकर नगर, किल्ल्याचे नाव- सिंहगड आणि अचानक मित्र मंडळ, साबेगाव, किल्ल्याचे नाव- विसापूर कठीणगड यांना ही सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक बक्षिस दिले. तसेच तृतीय क्रमांक विभागून क्षत्रिय कुलावंतस प्रतिष्ठान, साईबाबा मंदिर आगासन, किल्ल्याचे नाव- प्रतापगड आणि नव तरुण मित्र मंडळ, बेडेकर नगर, किल्ल्याचे नाव- प्रतापगड यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक बक्षिस दिले. चतुर्थ क्रमांक विभागून गडप्रेमी ग्रुप, वक्रतुंड नगर, किल्ल्याचे नाव- तोरणा आणि काळुबाई बाल मित्र मंडळ, म्हात्रे गेट, किल्ल्याचे नाव- रायगड यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक बक्षिस दिले. तर पाचवा क्रमांक विभागून शिवप्रेरणा ग्रुप, नाईक नगर, किल्ल्याचे नाव- अजिंक्यतारा आणि गावदेवी चाळ, बेडेकर नगर, किल्ल्याचे नाव- राजगड यांना ही सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि आकर्षक बक्षिस दिले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या भव्य दिव्य बक्षिस समारंभाला ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष संजय वाघुले, माजी ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर मनोहर सुखदरे, विक्रम भोईर, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रेश्मा पवार, नरेश पवार, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, समीर चव्हाण, अनुराज पाटील, जिलाजीत तिवारी, अशोक गुप्ता, नितीन कोरगांवकर, प्रकाश पाटील, विठ्ठल गावडे, रवी मुणंनकर, किरण कोरगांवकर, सुदेश पाटील,अनिल गावकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ, राकेश मिश्रा, विशाल गुप्ता आणि भाजपचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी पार पडलेल्या बक्षीस समारंभाने दिवा शहरात सणासुदीचा उत्साह आणखी वाढवला.
या उपक्रमामुळे मराठी संस्कृती, शिवरायांचा वारसा आणि ऐतिहासिक किल्ल्यांबद्दलची जागरूकता लहान मुलांच्या मनात रुजवण्यात आयोजकांना यश आले. या दिव्य समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदिका करुणा सचिन गगे बांगर यांनी आपल्या मनमोहक आणि भारदस्त आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंचीवर नेले.

