कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन उत्साहात संपन्न

Maharashtra WebNews
0




डोंबिवली ( शंकर जाधव )  : खान्देशी बोलीभाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडणाऱ्या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा मंगळवारी सकाळी ८ वाजता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व विभागातील सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने करण्यात आले. उद्यानात दररोज व्यायामासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या सहभागातून या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरले बहिणाबाई चौधरी उद्यानात डिजिटल पेंटिंग वर्क करणारे सुनील चौधरी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात समिती सदस्य, माजी नगरसेवक प्रकाश माने आणि विनय दीक्षित यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा स्मरण आणि त्यांच्या विचारांचा प्रसार याबद्दल मनोगत व्यक्त केले.




कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे सदस्य विलास सावंत, वसंत चिंदरकर, विकास सावकारे, संदीप शेट्टी, शंकर शिर्के, प्रतीक्षा प्रकाश माने, गीता नाईक, ममता तिवारी, सविता अनगोळकर, फुलचंद मासी, शरद जोशी, संतोष कारंडे, गिरीश कुलकर्णी, संदीप चिकणे, संगम भुजबळ, प्रीती नेमाडे, शशी शर्मा, अनंत पाटील, जयश्री पुत्रन, विकास जोशी, एल डी पाटील,अशोक जंगले, परशुराम म्हात्रे (काका), शरदचंद्र जोशी, सिताराम राऊळ, शिवबा शिर्के, स्वानंदी शिर्के, हेमंत बारस्कर, राजन जोशी, पद्मजा नागवेकर, अरुणा देशपांडे, माधुरी जोशी, मेघा ठोंबरे, नंदा शाळीग्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.अभिवादन सोहळ्याच्या सूत्रसंचालननाची जबानबदारी माजी नगरसेवक प्रकाश शांताराम माने यांनी सांभाळली तर आभार प्रदर्शन प्रदीप पवार विक्रम म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांनी केले.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)