डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले होते. आमदार मोरे यांनी आश्वासनाची पूर्तता करत प्रशासनाकडे पाठपुराने संदप गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे.श्री दत्तजयंती निमित्त संदप गावात श्री दत्त देवाचे दर्शन घेतल्यानंतर गावाकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांनी आमदार मोरे यांना गावातील पाणी प्रश्न काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास सुटेल असे सांगितले. यावर आमदार मोरे यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत होईल आपण उद्या पासून कामाला सुरुवात करा असे निर्देश दिले.
आमदार राजेश मोरे यांनी भोपर देसले पाडा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिरात दत्तजयंतीनिमित्त उत्सवात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचा संध्या अमृते यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.आमदार मोरे यांनी मंदिरात देवदर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भोपर गावात शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.पाटील यांच्या निवास्थानी आमदार मोरे यांनी श्री दत्त देवाचे दर्शन घेतले. पुढे खोणी गावातील माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या निवास्थानी आमदार मोरे यांनी श्री दत्ताचे दर्शन घेतले.तसेच खोणी गावात श्री नवनाथ महाराजाचे भव्य मंदिर उभारले जात असून यासंदर्भात हनुमान ठोंबरे यांनी माहिती दिली. यावेळी नवनाथ पाटील (शिवसेना विभाग संघटक ), मारुती ठोंबरे ( शाखाप्रमुख ) आदी उपस्थित होते.
संदप गावात दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यानंतर आमदार मोरे यांनी गावाकऱ्यांशी पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांना बोलावून गावातील पाणी प्रश्न कशाप्रकारे सुटेल याची माहिती घेतली. चेतन मोरे यांनी सांगितले की, संदप गावापर्यत आलेल्या पाण्याच्या लाईनमध्ये प्रेशर कमी आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाने नविन् लाईन टाकल्यास पाणी प्रश्न सुटेल. यावर आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.आमदार मोरे यांच्या प्रयत्नाने संदप गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने येथील गावाकऱ्यांनी आमदार मोरे यांचे आभार मानले.
तसेच लोढा ग्लोबल पार्क मधील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर येथेही पाणी प्रश्न गंभीर आल्याचे आमदार मोरे यांना समजले.तात्काळ आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनातील पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून येथील पाणी प्रश्न लवकरात सोडवावा असे निर्देश दिले.यावेळी विलास देसले हेही उपस्थित होते.