दिवा, (आरती परब) : दिवा शहरात सुरू असलेल्या १६ व्या दिवा महोत्सवात नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत ऊबाठा गटातील विभाग प्रमुखांसहित २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत ( शिंदे गट) पक्ष प्रवेश केला होता. तेव्हा उबाठा पक्षाला धक्का दिल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील जोरदार धक्का दिला. मनसेचे विभाग अध्यक्ष सोपान जाधव यांनी काही शाखाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शाखाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थतीत शिवसेनेत प्रवेश केला.
दिवा शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत, शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या विकासाच्या दूरदृष्टी वर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सोपान जाधव यांनी सांगितले. यावेळी उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत, माजी नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, युवतीसेना शहर अधिकारी साक्षी मढवी, विभागप्रमुख उमेश भगत, विनोद मढवी, चरणदास म्हात्रे, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, अरुण म्हात्रे, सचिन चौबे, राजेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.