जिल्हा युवा महोत्सवात प्रिझम संस्थेच्या कलाकारांचा प्रथम क्रमांक

Maharashtra WebNews
0

 



समूह लोकगीत व समूह लोकनृत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन 

अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, नेहरू युवा केंद्र, रायगड अलिबाग, माय भारत रायगड अंतर्गत जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन पी.एन.पी.कॉलेज, अलिबाग या ठिकाणी करण्यात आले होते. 




यावेळी प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी पारंपारिक मंगळागौर सादर करीत लोकनृत्य या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर लोकगीतात भारुड सादर करीत उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला असून मुंबई विभागीय युवा महोत्सवात प्रिझम संस्थेचे कलाकार रायगडचे नेतृत्व करतील. 




प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर, परीक्षिका प्राजक्ता कोकणे, ॲड कलाताई पाटील, वंदना आंब्रे, धनंजय कवठेकर, समीर मालोदे, क्रीडा अधिकारी दिपाली बोडके, क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या हस्ते देण्यात आले. या युवा महोत्सवात मोठ्या प्रमाणात युवक युवती सहभागी झाल्या होत्या.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)