- माजी आमदार नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन
- शहापूर , मुरबाड आणि बदलापूरमध्ये सदस्य अभियान बैठक
डोंबिवली ( शंकर जाधव) : 'सेवा ही संघटन' या तत्त्वावर वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्ष परिवाराचे सदस्यत्व म्हणजे देशासेवा करण्याची सुवर्णसंधी असल्याचे मत भाजपचे माजी आमदार आणि सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रदेश सहसंयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. राज्य पातळीवरील सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत शहापूर, मुरबाड आणि बदलापूरमध्ये नरेंद्र पवार, आमदार किसन कथोरे यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठका संपन्न झाल्या. त्यामध्ये पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
आजच्या घडीला भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक सदस्य असलेला भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेली गतिमान विकासकामे आणि भविष्याचा वेध घेत दूरगामी परिणाम करणाऱ्या ध्येय धोरणांची आखणीच नव्हे तर अंमलबजावणीही सुरू आहे. या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन आज देशभरात अनेकजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. तर 'राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' या मूलभूत विचारधारेवर भाजपची सुरुवातीपासून वाटचाल सुरु असून कोट्यावधी कार्यकर्ते हीच आपल्या भाजपा परिवाराची खरी ताकद असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शहापूर, मुरबाड आणि बदलापूरमध्येही आपण सर्वांनी अधिकाधिक संख्येने भाजपमध्ये नव्या सदस्याची नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज भारतीय जनता पक्षाच्या शहापूर तालुका, शहापूर शहर मंडळ, मुरबाड ग्रामीण, मुरबाड शहर मंडळांची ही सदस्यता नोंदणी अभियान बैठका संपन्न झाल्या. ज्यामध्ये आमदार किसन कथोरे, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक, शहापूर तालुका प्रभारी अध्यक्ष तुकाराम भाकरे, भाजपा मुरबाडचे उल्हास बांगर, नितीन मोहपे, विलास देशमुख,एच.पी. घोलप सर, पष्टे सर, सुरेश बांगर,दिपक पवार, अनिल घरत, बदलापूर माजी नगराध्यक्ष राजनजी घोरपडे, जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे, भाजपा बदलापूर पूर्व मंडल अध्यक्ष संजय भोईर, बदलापूर पश्चिम मंडल अध्यक्ष शरद तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
य